Earthquake in West Maharashtra - pune 4.2
Written by admin on July 31st, 2008 in News.
Earthquake in pune 4.2
पश्चिम महाराष्ट्र भूकंपाने हादरला
पुणे/कोल्हापूर, ता. २९ - भूकंपाच्या धक्क्याने आज मध्यरात्री पश्चिम महाराष्ट्र हादरला. पुणे जिल्ह्यासह, सातारा, कोल्हापूर, सांगली, रत्नागिरी जिल्ह्यातही भूकंपाचा धक्का जाणवला.
मुंबई शहर आणि उपनगरांतही भूकंपाचा सौम्य धक्का बसला. या भूकंपाची तीव्रता ४.२ रिश्टर होती. सातारा जिल्ह्यातील कोयना धरण परिसरात भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सूत्रांनी सांगितले. या भूकंपाने कोणतीही हानी झाल्याचे वृत्त नाही.
मध्यरात्री १२.४१ च्या सुमारास सुमारे १५ ते २० सेकंद हा भूकंप जाणवला. पुणे शहर आणि परिसरात सौम्य धक्के बसले. सातारा जिल्ह्यात कोयना, कोयना धरण परिसर, कोल्हापूर जिल्ह्यात भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. हादऱ्यामुळे अनेक ठिकाणी घरातील भांडी पडली. सर्वत्र पाऊस सुरू असतानाच भूकंप झाल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली. हादरा बसताच अनेक नागरिकांनी मोकळ्या जागेत धाव घेतली. भूकंप झाल्याची खात्री करण्यासाठी अनेक नागरिकांनी “सकाळ’ कार्यालयात दूरध्वनी करून माहिती घेतली. अहमदाबाद आणि बेंगळूरुमध्ये नुकत्याच झालेल्या बॉंबस्फोटांच्या पार्श्वभूमीवर हा हादरा कशाचा अशी विचारणा नागरिक करीत होते.
—————————-
अमेरिकेतही भूकंप
अमेरिकेतही याच सुमारास ५.८ रिश्टर क्षमतेचा भूकंप जाणवला. लॉस एंजेलिसच्या पूर्वेकडील भागास भूकंपाचा तीव्र धक्का जाणवला. हानी झाल्याचे वृत्त मिळू शकले नाही.
